शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

केंद्राच्या दोन लाख कोटींच्या कर्ज योजनेच्या हेतूला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 3:41 AM

फक्त ४६ टक्के खातेदारांनीच घेतले कर्ज

- अतुल कुलकर्णीमुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊन काळात २ लाख कोटी रुपये उद्योगांना देण्यासाठी म्हणून फक्त साडेसहा टक्के व्याजाने देण्याची योजना जाहीर केली. त्यापैकी आजमितीला देशात फक्त ४६ टक्के खातेदारांनीच कर्ज उचलल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी कमी व्याजदराचे हे कर्ज घेऊन स्वत:चे जास्त व्याजदराचे कर्ज फेडण्यासाठी याचा वापर केल्याचे आकडेवारी सांगते. परिणामी एवढे कर्ज देऊनही रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीत गेल्या चार महिन्यांत सगळ्या बँकांचे मिळून ७ लाख कोेटींनी कर्ज कमीच झाले आहे.सरकारी, खासगी व बिगर बँकींग संस्थांनी हे कर्ज वाटप झाले आहे. महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर आपल्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २,७४,२०४ खातेदारांना ७,५०४ कोटी २८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यापैकी १,५४,४३७ खातेदारांना ५,५१२ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. लोकांनी स्वस्त दराने कर्ज मिळत असतानाही हे कर्ज घेण्याची तयारी दर्शवलेली नाही, असे सांगून एक बँक अधिकारी म्हणाले, केंद्र सरकारची योजना चांगली होती.केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा काही उद्योगांना व खातेधारकांना झाल्याचे दिसते. डायरेक्ट कॅश रिलीफ या योजनेअंतर्गत अमेरिकेने ७५,००० डॉलर्सपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांना १,२०० डॉलर्स थेट खात्यात जमा करणे सुरु केले. चार जणांच्या एका कुटुंबात जास्तीत जास्त ३४०० डॉलर्स मिळू शकतील, अशी व्यवस्था केली. इंग्लंडमध्ये ‘जॉब रिटेन्शन स्कीम’अंतर्गत प्रत्येकाला महिन्याला सरासरी २५०० पौंड देण्याची तरतूद केली. जर्मनीने ‘शॉर्ट टाईम वर्क’ योजनेतून कामगारांचा ६०% पगार दिला. ही योजना युरोपियन महासंघाने लागू केली. आपण असा थेट पैसा द्यायला हवा होता. तो न दिल्याने आर्थिक चक्रात अडकलो आहोत.- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्रीदेशातील स्थितीखातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप३९,६६,७८८ १,३७,५८६.५४ २१,७८,२७७ ९२,०९०.२४ (कोटी)महाराष्ट्रातील स्थितीखातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप २,७४,२०४ ७,५०४.२८ १,५४,४३७ ५,५१२.९५ (कोटी)सार्वजनिक क्षेत्रातील बँकाखातेधारक मंजूर कर्ज (कोटी) खातेधारक प्रत्यक्षात वाटप३३,४२,१३४ ७२,८२०.२६ १९,०९,२९८ ५२,०१३.७६(कोटी)कर्जवाटपात देशातल्या टॉपच्या २ बँका कोणत्या?                                         खातेधारक        मंजूर कर्ज         खातेधारक         प्रत्यक्षात वाटपस्टेट बँक ऑफ इंडिया       ५,४६,५०१    २१,१२१ (कोटी)     २,९९,३७५        १६,०४७ (कोटी)कॅनरा बँक                         ४,६५,२३९    ८,२४४ (कोटी)      ३,५९,४९४        ६,२०० (कोटी)कर्जवाटपात देशातल्या ‘बॉटम’च्या २ बँका कोणत्या?                                      खातेधारक     मंजूर कर्ज        खातेधारक     प्रत्यक्षात वाटपपंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक     ३७,२७७      ८५९ (कोटी)       ३०,६५३        ७२६ (कोटी)युको बँक                        १,४७,७८५   १,०९९ (कोटी)    ५६,५८६       ७९१ (कोटी)साडेसहा टक्के व्याजाने मिळणारेकर्ज घेऊन लोकांना आपल्या व्यवसायाचे पुनरुज्जीवन करता आले असते. कामगारांना काही प्रमाणात पगार देऊन परत कामावर आणता आले असते. मात्र हे दोेन्ही हेतू यातून साध्य झालेले दिसत नाही.महाराष्टÑ स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष आणि बँक आॅफ महाराष्टÑचे माजी डायरेक्टर देविदास तुळाजापूरकर म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होऊनही रिझर्व्ह बँकेच्या रेकॉर्डवर एकूण कर्जाची रक्कम वाढलेली दिसत नाही. उलट सगळ््या बँकांची कर्जाची रक्कम कमीच होताना दिसत आहे.