शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली, दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्यांना दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 16:14 IST

Corona Cases: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनामुळे चिंतेत असलेले केंद्र सरकार आता कृतीत उतरले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून तेथील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील कोरोनाच्या दैनंदिन नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचा संदर्भ देत राजेश भूषण यांनी केरळ, दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा आणि मिझोरामच्या अधिकाऱ्यांना संसर्ग रोखण्यासाठी सतत देखरेख ठेवण्याचे आणि कोरोना व्यवस्थापनासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. याचबरोबर, कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी चाचणी, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन या पाच-सुत्रीय धोरणांचा अवलंब करण्याची गरज आहे, असेही राजेश भूषण म्हणाले. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही आज कोरोनाच्या नवीन 'XE व्हेरिएंट ' संदर्भात बैठक घेतली. यावेळी कोरोनाच्या प्रकरणांचाही आढावा घेतला आणि कोरोनाचे नवीन  व्हेरिएंट्स आणि प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी सुरू असलेली देखरेख आणि पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना मनसुख मांडविया यांनी दिल्या आहेत.

केंद्राकडून देखरेख वाढवण्याच्या सूचनामंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, अधिकाऱ्यांना कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे आणि औषधांच्या उपलब्धतेचा सतत आढावा घेण्यास सांगितले आहे. लसीकरण मोहीम पूर्ण गतीने राबवण्यावर आणि सर्व पात्र लोकांना लसीकरण करण्यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बैठकीत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव, भारतातील लसीकरण पण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख डॉ. एन.के. अरोरा आणि आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यOmicron Variantओमायक्रॉन