शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

NIA आणि ED कडून गेल्या वर्षांत किती कारवाया झाल्या? केंद्र सरकारकडून लोकसभेत उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:57 IST

NIA, ED Action in Past Years : लोकसभेच्या अधिवेशनात मंगळवारी देशाची महत्त्वाची तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित एका रिपोर्टवर उत्तर देण्यात आले.

नवी दिल्ली :  भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये किंवा देशविरोधी, दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये गुंतलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या कायद्यानुसार ओळखल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत किती गुन्हे दाखल झाले आणि आरोपींच्या किती मालमत्ता जप्त केल्या? या मुद्द्यावर लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारने मंगळवारी उत्तर दिले.

केंद्र सरकारच्या अंतर्गत गृह मंत्रालयाने लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, गेल्या तीन वर्षांमध्ये (2018 -21) एकूण 64 प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रिय गृह मंत्रालयाने एनआयएच्या टीमला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही प्रकरणे देशविरोधी कारवाया करण्यात सहभागी असलेल्या अशा दहशतवादी आणि संघटनांविरुद्ध होती. या प्रकरणांमध्ये जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, ईशान्य राज्ये, पश्चिम बंगाल, झारखंड आणि इतर राज्यांशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत, ज्यांचा तपास सुरू आहे.

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, या वर्षांमध्ये एनआयएकडे सोपविण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या पुढीलप्रमाणे आहे...1) 2018 मध्ये 18 गुन्हे दाखल.2) 2019 मध्ये 14  गुन्हे दाखल. 3) 2020 मध्ये 23  गुन्हे दाखल. 4) 2021 मध्ये नोव्हेंबरपर्यंत 09  गुन्हे दाखल करण्यात आले.

 

ईडीच्या कारवाईवर लोकसभेत उत्तर...लोकसभेच्या अधिवेशनात मंगळवारी देशाची महत्त्वाची तपास यंत्रणा असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित एका रिपोर्टवर उत्तर देण्यात आले. यावेळी दहशतवादी कारवाया किंवा इतर भ्रष्ट व्यक्तींशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कशी कारवाई केली गेली, याबद्दल औपचारिक माहिती देण्यात आली. केंद्र सरकारकडून ईडीबाबत ही माहिती देण्यात आली की, ईडीने जवळपास 250 मालमत्ता जप्त केल्या आहेत, ज्यांचे अंदाजे बाजार मूल्य सुमारे 881 कोटी रुपये आहे आणि यामध्ये भारतातील 677.73 कोटी रुपये आणि विदेशातील 203.27 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा समावेश आहे.  

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयlok sabhaलोकसभा