शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता बनावट हल्मेट, प्रेशर कुकर विकणाऱ्यांची खैर नाही, सरकारनं उचललं मोठं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 16:36 IST

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठीच्या मोहिमेला आता वेग देण्याचं ठरवलं आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठीच्या मोहिमेला आता वेग देण्याचं ठरवलं आहे. बनावट आय एस (IS Mark) चिन्हं असलेले प्रेशर कुकर (Pressure Cooker), दुचाकीसाठीचं हेल्मेट (Helmet) आणि घरगुती गॅस सिलिंडर (Cooking Gas Cylinder) विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक अभियान सुरू केलं जाणार आहे. सीसीपीएनं याआधीच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबतची नोटीस जारी केली आहे. 

'सीसीपीए'च्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-कॉमर्सवर अनेक विक्रेते आहेत की जे भारतीय मानक ब्युरोच्या मापदंडांची पूर्तता करत नाहीत आणि त्यांच्याकडून बनावट प्रेशर कुकरची विक्री सुरू आहे. भारतीय मानक ब्युरोच्या मापदंडांची पूर्तता न करणाऱ्या प्रेशक कुकरची विक्री सुरू असल्याबद्दल सीसीपीएनं पाच ई-कॉमर्स वेबसाइट्सना नोटिस धाडली आहे. 

केवळ ऑनलाइनच नव्हे तर ऑफलाइन पद्धतीनं बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट घरगुती उत्पादनांच्या विक्रीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. बनावट वस्तूंचा नायनाट करण्याविरोधातील देशव्यापी मोहिमेअंतर्गत प्रेशक कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर या तीन वस्तूंवर भर देत आहोत, असंही निधी खरे यांनी सांगितलं. 

प्रत्येक जिल्हा पातळीवर बनावट उत्पादनांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सीसीपीएनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कंपन्यांविरोधात तक्रारी आल्या आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी आपल्या अधिकाराअंतर्गत यात कारवाई करुन दोन महिन्यात याचा सविस्तर अहवाल देणार आहेत. याशिवाय बनावट उत्पादनांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सवर नजर ठेवून असल्याचंही निधी खरे यांनी सांगितलं. 

BIS चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहनग्राहकांनी आपली आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन बीआयएसचं भारतीय मानक मापदंडाचं चिन्ह असलेल्या वस्तू खरेदी कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. वेबसाइटवरुन खरेदी करतानाही ग्राहकांना वस्तूच्या फिचर्समध्ये आयएस चिन्ह पाहता येऊ शकतं. प्रेशर कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या विक्री आयएस चिन्हाशिवाय केली जाऊ शकत नाही. हेल्मेटवर बीआयएसचं  ‘IS 4151:2015’ असं चिन्ह आणि प्रेशर कुकरवर ‘IS 2347:2017’ असं चिन्ह असणं गरजेचं आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरAutomobileवाहन