दुष्काळाची पाहणीसाठी केंद्राचे पथक जिल्ात दौरा : जिल्ातील पाच गावांची करणार पाहणी
By Admin | Updated: November 19, 2015 21:58 IST2015-11-19T21:58:32+5:302015-11-19T21:58:32+5:30
जळगाव : जळगाव जिल्ातील दुष्काळीस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी शुक्रवार २० रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत.

दुष्काळाची पाहणीसाठी केंद्राचे पथक जिल्ात दौरा : जिल्ातील पाच गावांची करणार पाहणी
ज गाव : जळगाव जिल्ातील दुष्काळीस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकातील अधिकारी शुक्रवार २० रोजी जळगाव जिल्ाच्या दौर्यावर येत आहेत. केंद्रीय पथकातील अधिकारी हे धुळे येथून जळगावकडे येणार आहेत. यावेळी पारोळा तालुक्यातील म्हसवे या दुष्काळग्रस्त गावाची ते पाहणी करतील. या ठिकाणी पाहणी केल्यानंतर ते जळगाव तालुक्यातील वावडदा येथे पाहणी करतील. त्यानंतर जामनेर तालुक्यातील मालदाभाडी व बोदवड तालुक्यातील शेलवड व वरखेड या गावांतील दुष्काळीस्थितीची पाहणी करणार आहेत. या पथकासोबत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह संबंधित तालुक्यातील महसूलचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.