केंद्रीय सचिव सुनील सोनी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 01:47 IST2015-06-13T01:47:05+5:302015-06-13T01:47:05+5:30
केंद्रीय गृह खात्याच्या आंतर-राज्य सचिवालय परिषद(डिपार्टमेंट आॅफ इंटर स्टेट काऊंसिल सेक्रेटरीएट) विभागाच्या सचिव सुनील सोनी यांचे

केंद्रीय सचिव सुनील सोनी यांचे निधन
नवी दिल्ली : केंद्रीय गृह खात्याच्या आंतर-राज्य सचिवालय परिषद(डिपार्टमेंट आॅफ इंटर स्टेट काऊंसिल सेक्रेटरीएट) विभागाच्या सचिव सुनील सोनी यांचे शुक्र वारी सकाळी हृदय विकाराने वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांनी या पदाचा कार्यभार ३ जून रोजी स्वीकारला होता. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कटुंबियांनी दिली.
ते २०१२ पासून प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारच्या वित्त विभागात अतिरीक्त सचिवपदावर रूजू झाले. त्यानंतर त्यांनी भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक पद भूषिवले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २०१४ मधे त्यांनी विशेष सचिव पदाची सूत्रे सांभाळली. मध्यप्रदेशात जन्मलेले सोनी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र केडरच्या १९८१ तुकडीचे अधिकारी होते.
१९८३ मधे यवतमाळचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारिकर्दीची सुरु वात केली. पुढे राज्याच्या वित्त विभागाचे प्रधान सचिव म्हणून २००७ साली सुनील सोनी यांनी कार्यभार सांभाळला होता. (विशेष प्रतिनिधी)