शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

येणार तर मोदीच! नितिन गडकरींनी केली 2024 ची भविष्यवाणी, MP-राजस्थानवरही मोठं भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 19:52 IST

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 हून अधिक जागा मिळवत बहुमताचे सरकार स्थापन केले होते. 

राजकीय विषयांवरही स्पष्टपणे भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 2024 मध्ये पूर्वीपेक्षाही अधिक जागांसह सरकार येईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 300 हून अधिक जागा मिळवत बहुमताचे सरकार स्थापन केले होते. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांसंदर्भात भाष्य करत, येथेही भाजपचाच विजय होईल, असे गडकरी यांनी म्हटले आहे. मात्र, तेलंगणा निवडणुकीसंदर्भात त्यांनी असा दावा केला नाही. पण आम्ही तेथे एक मजबूत पक्ष म्हणून उदयास येऊ, आमची ताकद पूर्वीपेक्षा अधिक असेल, असे गडकरी म्हणाले.

मोफतचे राजकारण लोकशाहीसाठी घातक -एएनआयसोबत बोलताना गडकरी म्हणाले, 'आम्हाला लोकसभा निवडणुकीत पूर्वीपेक्षाही अधिक जागा मिळतील. आम्ही देशाचे भविष्य सुधारले असून जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला पुन्हा एकदा विजयी करणार आहे. याचवेळी गडकरी यांनी, मोफतच्या विजेसह फुकटच्या योजनाही अयोग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, वीज कंपन्या 18 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहेत. हे असेच चालू राहिले तर आपले ऊर्जा क्षेत्रच नष्ट होईल. निवडणुका जिंकायच्या असतील तर गरिबांसाठी घरे बांधा आणि त्यांना रोजगार द्या. आपण जनतेला एखादी गोष्ट फुकट दिली, तर त्याचे महत्त्व कमी होते. हे मोफतचे राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.'

काँग्रेसने 60 वर्षात केले नव्हते, ते आम्ही 10 वर्षांत केले -  विरोधी पक्ष आणि परदेशातील माध्यमे भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचे सांगत आहेत, यावर बोलताना गडकरी म्हणाले, तसे नाही. कोणतीही व्यवस्था आपल्या कायद्याने चालते, जेव्हा काही लोक कायद्यासमोर अपयशी ठरतात, तेव्हा ते असे आरोप करतात. जे काम काँग्रेसने 60 वर्षात केले नव्हते, ते काम आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षात केले आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक