शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याबद्दल सुषमा स्वराज यांचं अभिनंदन; केंद्रीय मंत्र्याचं ट्विट, नंतर डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 22:18 IST

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ...

नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं. हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राज्यपाल झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन केलं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. स्वराज या मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. मात्र त्यांना मोदी सरकार 2 मध्ये मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. 'भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रात तुम्हाला असलेल्या अनुभवाचा जनतेला फायदा होईल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं. स्वराज यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना हर्षवर्धन यांनी हे ट्विट केलं. सध्या ईसीएल नरसिम्हन आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे तेलंगणाचीदेखील जबाबदारी आहे. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजAndhra Pradeshआंध्र प्रदेश