केंद्र सरकार उत्तराखंड न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार
By Admin | Updated: April 21, 2016 20:58 IST2016-04-21T20:24:51+5:302016-04-21T20:58:20+5:30
केंद्र सरकार उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
केंद्र सरकार उत्तराखंड न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २१- केंद्र सरकार उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. हरिश रावत यांच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान उत्तराखंड उच्च न्यायालयानं हा राष्ट्रपती राजवट रद्द करण्याचा निर्णय दिला होता. लवकरच या निर्णयाविरोधात केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 29 एप्रिलला काँग्रेसच्या हरिश रावत यांना बहुमत सिद्ध करण्याची उत्तराखंड उच्च न्यायालयानं संधी दिली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.