केंद्र सरकारला माझ्याशी बदला घ्यायचा आहे - राहुल गांधी

By Admin | Updated: May 18, 2015 15:14 IST2015-05-18T14:46:08+5:302015-05-18T15:14:57+5:30

भाजपा सरकारला माझ्या बदला घ्यायचा आहे, सरकारच्या या सूडाच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

The Central Government wants to take revenge with me - Rahul Gandhi | केंद्र सरकारला माझ्याशी बदला घ्यायचा आहे - राहुल गांधी

केंद्र सरकारला माझ्याशी बदला घ्यायचा आहे - राहुल गांधी

ऑनलाइन लोकमत 

अमेठी, दि. १८ -  भाजपा सरकारला माझ्या बदला घ्यायचा आहे, सरकारच्या या सूडाच्या राजकारणात शेतकरी भरडला जात आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

पंजाब, महाराष्ट्र व तेलंगण दौ-यानंतर राहुल गांधी सोमवारपासून तीन दिवस त्यांच्या अमेठी मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. अमेठीतील शेतक-यांशी संवाद साधल्यावर राहुल गांधींनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. केंद्र सरकारने गरीब शेतक-यांची मदत करावी असे मला वाटते पण केंद्र सरकार सूडाचे राजकारण करत आहे अशी टीका त्यांनी केली. अमेठीत फूड पार्क झाला असता तर आमच्या शेतक-यांची परिस्थिती सुधारली असती, पण फूड पार्क रद्द करुन सरकारने शेतक-यांकडून हा प्रकल्प हिरावून घेतला असे राहुल गांधींनी म्हटले आहे. केंद्र सरकारने अमेठीत फूड पार्क प्रकल्प रद्द न करता तो प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी केली. 

Web Title: The Central Government wants to take revenge with me - Rahul Gandhi