केंद्र सरकार वादाच्या भोवऱ्यात

By Admin | Updated: January 30, 2015 05:58 IST2015-01-30T05:58:29+5:302015-01-30T05:58:29+5:30

राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द असावेत की नाही यावर चर्चा करण्याच्या केंद्र सरकारच्या सल्ल्यावर राष्ट्रीय लोकशाही

The central government is in the verge of dispute | केंद्र सरकार वादाच्या भोवऱ्यात

केंद्र सरकार वादाच्या भोवऱ्यात

चेन्नई/पाटणा : राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द असावेत की नाही यावर चर्चा करण्याच्या केंद्र सरकारच्या सल्ल्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष पीएमकेने टीका केली आहे. सरकारमधील घटकपक्ष शिवसेनेने बुधवारी प्रस्तावनेतील उपरोक्त शब्द हटविण्याची मागणी केल्यानंतर विविध राजकीय पक्षांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.
प्रजासत्ताकदिनी केंद्र सरकारने दिलेल्या जाहिरातीमधून समाजवाद व धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द वगळण्यात आल्याने हा वाद उफाळला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनीसुद्धा शिवसेनेच्या मागणीवर कडाडून टीका केली आहे. केंद्र सरकारने हे शब्द वगळणे हा योगायोग नाही, असे सपा नेते शिवपालसिंग यादव यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)

पीएमकेने वादग्रस्त जाहिरातीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मागणीनंतर सरकारने यावर चर्चेचा सल्ला द्यावा याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

Web Title: The central government is in the verge of dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.