शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडे कांद्याचा ४६ हजार टन साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 02:33 IST

आवक घटल्यामुळे भाव भडकले; नोव्हेंबरअखेर दिलासा मिळण्याची आशा

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कांद्याचे भाव भडकल्यानंतर केंद्र सरकारने भाव खाली आणण्यासाठी आमच्याकडे ४६ हजार मेट्रिक टन कांद्याचा साठा असल्याचे सांगितले. या शिवाय गरज भासल्यास साठ्याची मर्यादा ठरवून दिली जाईल, असेही म्हटले.प्रश्न हा आहे की कांद्याचा पुरेसा साठा असताना आणि साठ्याची मर्यादा योजना असूनही भाव का भडकले? याचे कारण हे सांगितले जाते की गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांद्याचा योग्य भाव न मिळाल्यामुळे तो त्यांनी रस्त्यांवर फेकला होता. एका कांदा व्यापाºयाने तर आपला कांदा विकून आलेले पैसे पंतप्रधान निधीला पाठवले होते. येत्या २१ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आहे.या परिस्थितीत साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढून केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेऊ इच्छित नाही. परिणामी निवडणुकीत कांदा लोकांना रडवतो आहे. किरकोळ विक्रीत कांद्याचा भाव ७० ते ८० रूपये झाल्यामुळे लोक त्रासले आहेत.केंद्र याबद्दल काय करणार असे विचारले असता केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले की, मदर डेअरी आणि नाफेड बूथ्सवर कांदा नियंत्रित दराने विकत आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत कांद्याच्या आवकीवर पाऊस, पुराचा परिणाम होत असतो. नोव्हेंबरअखेरपर्यंत मंडीत कांद्याचे नवे पीक आल्यावर भाव आपोआप नियंत्रित होतील.पासवान म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळतो आहे ही चांगली बाब आहे.लासलगावात ४४ ते ५0 रु.कि.दिल्लीत आझादपूर मंडीत कांद्याचा घाऊक विक्रीचा भाव २०१५ नंतर सर्वात जास्त म्हणजे ५० रुपये किलो झाला होता.महाराष्ट्रातील लासलगावात अशियातील सगळ्यात मोठी कांदा बाजारपेठ असून सोमवारी तेथे कांदा ४४ ते ५० रुपये किलो विकला गेला.व्यावसायिकांचे म्हणणे असे की, विक्रीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे त्याचा भाव वाढला आहे.आझादपूर मंडीत ओनियन मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी शुक्रवारी कांद्याची आवक १,०२६ टन होती तर दिल्लीत रोजचा खप सुमारे तीन हजार टन आहे.

टॅग्स :onionकांदा