१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के FDI चा केंद्र सरकारचा प्रस्ताव
By Admin | Updated: November 10, 2015 16:15 IST2015-11-10T16:15:17+5:302015-11-10T16:15:17+5:30
जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न

१५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के FDI चा केंद्र सरकारचा प्रस्ताव
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - जवळपास १५ क्षेत्रांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंlवणुकीला (FDI) मंजुरी देण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत असल्याचे वृत्त असून, बिहारमध्ये झटका बसल्यानंतर आर्थिक सुधारणांना चालना देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंड व तुर्कस्थानच्या दौ-यावर लवकरच जाणार असून त्याआधी ही घोषणा करण्यात येईल असा कयास आहे.
बांधकाम क्षेत्र, संरक्षण, प्रसारमाध्यमे, बँकिंग, औषधनिर्मिती, प्लॅन्टेशन अशा सुमारे १५ क्षेत्रांमध्ये विदेशी कंपन्यांना गुंतवणऊक करायची असल्यास त्यांना सरकारी मंजुरीची गरज भासणार नाही आणि ते भारतात ऑटोमॅटिक रूटच्या माध्यमातून सहज गुंतवणूक करू शकतील असा हा प्रस्ताव असल्याचे वृत्त सीएनएन आयबीएनने दिले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार असून त्यापूर्वी हा प्रस्ताव जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. सध्या अत्यंत बिकट स्थितीत असलेल्या बांधकाम क्षेत्रामध्ये FDI आल्यास रोजगार निर्मीतीला चालना मिळेल आणि मोदी सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेली वचने प्रत्यक्षात येतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
केंद्र सरकारच्या या प्रस्तावावर विरोधी पक्ष काय भूमिका घेतात हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.