शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने अजून ५४ चिनी अ‍ॅप्सवर घातली बंदी, Gerena Free Fire वरही लागू शकतात निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 10:58 IST

Ban on 50 Chinese apps: भारत सरकारने ५४ अजून चिनी स्मार्टफोन अ‍ॅप्सवर निर्बंध घातल्याचे वृत्त आहे. यापूर्वी २०२० मध्ये केंद्र सरकारने एकूण २७० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.  

नवी दिल्ली - भारत सरकारने ५४ अजून चिनी स्मार्टफोन अ‍ॅप्सवर निर्बंध घातल्याचे वृत्त आहे.  मात्र निर्बंध घातलेल्या अ‍ॅप्सची कुठलीही अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पण ईटी नाऊने दिलेल्या एका वृत्तानुसार सरकारशी संबंधित सूत्रांनी ही माहती दिली आहे. यापूर्वी २०२० मध्ये केंद्र सरकारने एकूण २७० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर २०२२ मध्ये सरकारकडून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गरेना फ्री फायर नावाचा एक प्रसिद्ध स्मार्टफोन गेम आधीच गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून गायब झाला होता. त्यामुळे असे वाटते की, या गेमचा प्रतिबंधित अ‍ॅपच्या लिस्टमध्ये समावेश असू शकतो. दरम्यान, अद्याप तरी अ‍ॅपल किंवा गुगलकडून याबाबत अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपच्या पूर्ण यादीबाबत अद्याप खूप कमी अधिकृत माहिती समोर आलेली आहे. मात्र समोर येत असलेल्या वृत्तानुसार निर्बंध घातलेल्या अ‍ॅपच्या नव्या यादीमध्ये २०२० मध्ये बंदी घातलेल्या बहुतांश अ‍ॅपच्या क्लोन अ‍ॅपचा समावेश आहे. त्यामुळे ५४ अजून अ‍ॅपवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे भारत सरकारकडून निर्बंध घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सची एकूण संख्या ३२० वर पोहोचली आहे.

दरम्यान, भारत सरकारने याआधी टिकटॉक आणि पब्जी मोबाईल सह अनेक प्रसिद्ध अ‍ॅप्सवर निर्बंध घातले होते. त्यानंतर पब्जीने भारतामध्ये पुनरागमन करण्यात कसेबसे यश मिळवले. मात्र टिकटॉकवर देशात अद्याप बंदीच आहे.  

टॅग्स :MobileमोबाइलCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतchinaचीन