शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पीएफआय संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी का घातली?,वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 10:19 IST

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली.

PFI Banned In India : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध  (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुन्हा धडक कारवाई केली असून मंगळवारी एकाच दिवशी संघटनेशी संबंधित १५० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले तर काहींना अटक करण्यात आली. आता केंद्र सरकारने यावर मोठी कारवाई करते बेकायदेशीर संघटना ठरवत  बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पाच कारणांसाठी या संघटनेवर केंद्राने बंदी घातली आहे.  

पीएफआयवर दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही आहे. पीएफआयविरोधात भक्कम पुरावे मिळाल्यानंतरच या संस्थेवर ५ वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बेकायदेशीर संघटना ठरवत PFI संघटनेवर ५ वर्षांची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

पीएफआयसह अन्य संघटनाविरोधात गेल्या काही दिवसापासून देशात छापेमारी सुरू आहे.एनआयए, ईडी यासह राज्य पोलीस पथकेही पीएफआयच्या ठिकांणांवर छापेमारी करत आहेत. या संघटनांच्या विरोधात पुरावे मिळाल्यानंतरच केंद्रीय गृहमंत्रालयाने ५ वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केद्रांने अधिसूचनाही जारी केली आहे. पाटणा येथील फुलवारी शरीफ टेरर मॉड्युलमध्ये पीएफआयचे नाव आले आहे. तसेच एका प्राध्यापकाचा हात कापल्याचा आरोपही आहे.

'पीएफआय'वर बंदी का घातली?

पीएफआयवर देशाविरोधात कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीएफआयचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट ऑफ सीरिया आणि इराकशी कनेक्शन असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. देशात वेगवेगळ्या विचार असलेल्या व्यक्ती आणि संस्थाविरोधात हिंसात्मक वृत्ती ठेवणे, अतिरेक्यांसाठी फंड गोळा करणे, देशाच्या घटनात्मक अधिकारांना आव्हान देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे, असे आरोप पीएफआय विरोधात करण्यात आले आहेत. त्यामुळे या संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी घालण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे.  

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयIndiaभारत