शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पेट्रोलमधून प्रतिलीटर ३३ रु, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाई; सरकारनं लोकसभेत केलं मान्य   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 18:12 IST

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २७ फेब्रुवारीपासून स्थिर आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारसाठी ही चांगली गोष्ट असली तरी आज लोकसभेत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमधून बक्कळ कमाई मिळत असल्याचं मान्य केलं आहे. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती २७ फेब्रुवारीपासून स्थिर आहेत. निवडणुकीच्या काळात सरकारसाठी ही चांगली गोष्ट असली तरी आज लोकसभेत केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलमधून बक्कळ कमाई मिळत असल्याचं मान्य केलं आहे. (Central Government Earing From Petrol And Diesel)

पेट्रोलमधून ३३ रुपये, तर डिझेलमधून ३२ रुपयांची कमाईकेंद्र सरकारनं एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मान्य केलं की ६ मे २०२० नंतर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क, उपकर आणि अधिकार यांच्यातून अनुक्रमे प्रतिलीटर ३३ रुपये आणि ३२ रुपयांची कमाई होते. मार्च २०२० ते मे २०२० या काळात पेट्रोल आणि डिझेलमधून मिळणारी कमाई अनुक्रमे २३ आणि १९ रुपये इतकी होती. 

वर्षभरात तब्बल १३ रुपयांनी वाढली सरकारची कमाईगेल्या वर्षी १ जानेवारी ते १३ मार्च २०२० या काळात केंद्र सरकारची पेट्रोल आणि डिझेलमधून होणारी कमाई अनुक्रमे २० रुपये आणि १६ रुपये प्रतिलीटर इतकी होती, अशी माहिती सरकारनं लोकसभेत दिली. पण आता ३१ डिसेंबर २०२० मधील कमाईशी तुलना करायची झाल्यास पेट्रोलमधून होणाऱ्या कमाईत प्रतिलीटरमागे १३ रुपये आणि डिझेलमधून प्रतिलीटरमागे १६ रुपयांनी कमाईत वाढ झाली आहे. 

निवडणूक काळात का वाढत नाहीयत किमती?जर आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर ठरत असतात मग देशात चार राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं आताच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर कशा? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला. त्यावर सरकारनं चुप्पी साधल्याचं पाहायला मिळालं. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरविण्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असतात यात इतर देशांतील सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सवलतींचा देखील समावेश असतो. सरकार या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवत नाही, असं म्हणाले.  

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbusinessव्यवसाय