शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बंगालमध्ये सेंट्रल फोर्स, दिल्लीत पोलिसांच्या तैनातीत शोभायात्रा; हनुमान जन्मोत्सवानिमित्त देशभरात अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 02:05 IST

कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.

रामनवमीच्या मुहूर्तावर देशातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प. बंगालपासून ते बिहार, झारखंडपर्यंत तणाव निर्माण झाला होता. आता हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. कुठे शोभायात्रेची तयारी सुरू आहे, तर कुठे मंदिरांमध्ये भाविक एकत्रित जमण्याची तयारी करत आहेत. मात्र यावेळी समाज कंटक आणि उपद्रवी लोकांकडून रामनवमी प्रमाणे हुल्लडबाजी होऊन हिंसाचार उफाळू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.

उच्चन्यायालयाने फटकार लगावल्यानंतर बंगालमध्ये अलर्ट -रामनवमी प्रमाणे स्थिती आता निर्माण होऊ नये म्हणून, राज्यांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालमध्ये अजूनही हिंसाचार सुरू असल्याने तेथील प्रशासन हनुमान जयंतीनिमित्त अधिक सतर्क झाले आहे. कोलकाता उच्च न्यायालयालाही येथे हस्तक्षेप करावा लागला आहे. हनुमान जयंती संदर्भात काय व्यवस्था आहेत? असा प्रश्न कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला विचारला आहे. तसेच, जर बंगाल पोलिस परिस्थिती हाताळण्यास सक्षम नसतील, तर निमलष्करी दलाची मदत घ्यावी, याच बरोबर जेथे कलम 144 लागू आहे, तेथे कोणतीही शोभायात्रा अथवा मिरवणूक काढू नये, असे निर्देशही कोलकाता उच्च न्यायालयानेही ममता सरकारला दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हनुमान जयंतीनिमित्त बंगालमध्ये शांतता बाळगावी, असे आवाहन जनतेला केले आहे. हा उत्सव आनंदाने साजरा करा. बंगाल ही शांतता प्रीय भूमी आहे. खरे तर, रामनवमीच्या हिंसाचारानंतर, हनुमानांबद्दल सर्वांना आदर आहे, परंतु हिंसाचार कुठल्याही परिस्थितीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा एकदा काही वाईट तत्व हिंसाचार पसरवण्याचे काम करू शकतात, असे सीएम ममता म्हणाल्या होत्या.

ममतांच्या याच वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. ममतांच्या राजवटीत हिंदूंवर सातत्याने हल्ले होत असल्याचेही भाजप सातत्याने म्हणत आहे. यातच आता बंगालमध्ये हनुमान जन्मोत्सवाप्रसंगीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी केंद्रीय दलाच्या तीन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

दिल्लीत पोलीस तैनात, जहांगीरपुरीतून निघणार शोभायात्रा -जहांगीरपुरी येथे गेल्यावर्षी प्रमाणे पुन्हा उपद्रव होऊ नये यासाठी, येथे सुरक्षा दलाचा मार्च निघत आहे. महत्वाचे म्हणजे,  विश्व हिंदू परिषदेने जहांगीरपुरीतून मिरवणूक काढण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी पोलिसांनी यासाठी परवानगी दिली नव्हती, मात्र आता याला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. अर्थात आता ही मिरवणूक पोलीस बंदोबस्तात निघेल. 

केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायजरी? -यातच केंद्र सरकारनेही यासंदर्भात अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, राज्यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कायदा आणि सुरक्षा व्यवस्थित करावी. तसेच, समाजातील शांतता-सद्भाव बिघडविणाऱ्या कुठल्याही घटनेकडे दूर्लक्ष करू नये, असे म्हणण्यात आले आहे. यासंदर्भात, गृह मंत्रालयाने ट्विट केले आहे, "गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासंदर्भात, उत्सवाचे शांततेने पालन करणे आणि समाजात सांप्रदायिक सलोखा बिघडवणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे."

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीPoliceपोलिसwest bengalपश्चिम बंगालdelhiदिल्ली