सेन्ट्रल डेस्क.... मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी गुन्हेगार नाही! देवायानी खोब्रागडे यांनी दिले स्पष्टीकरण

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:26+5:302014-12-20T22:28:26+5:30

अकोला : मोलकरीणला चुकीची वागणूक देणे किंवा पासपोर्ट घोटाळा करणे, असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्या अनुषंगाने मला गुन्हेगाराच्या चौकटीत उभे करण्यात आले; परंतु मी कुठलाही गुन्हा केला नाही, त्यामुळे मी गुन्हेगार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेतील भारतीय दूतावासातील माजी वरिष्ठ अधिकारी व परराष्ट्र मंत्रालयातील संचालक देवयानी खोब्रागडे यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

Central desk .... I have not committed any crime, I am not a criminal! Deviya Khobragade gave the explanation | सेन्ट्रल डेस्क.... मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी गुन्हेगार नाही! देवायानी खोब्रागडे यांनी दिले स्पष्टीकरण

सेन्ट्रल डेस्क.... मी कुठलाही गुन्हा केला नाही, मी गुन्हेगार नाही! देवायानी खोब्रागडे यांनी दिले स्पष्टीकरण

ोला : मोलकरीणला चुकीची वागणूक देणे किंवा पासपोर्ट घोटाळा करणे, असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. त्या अनुषंगाने मला गुन्हेगाराच्या चौकटीत उभे करण्यात आले; परंतु मी कुठलाही गुन्हा केला नाही, त्यामुळे मी गुन्हेगार नाही, असे स्पष्टीकरण अमेरिकेतील भारतीय दूतावासातील माजी वरिष्ठ अधिकारी व परराष्ट्र मंत्रालयातील संचालक देवयानी खोब्रागडे यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना दिले.
स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता देवयानी खोब्रागडे शनिवार अकोल्यात आल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आपली बाजू मांडली. माझ्यावर ज्या मोलकरणीवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे, तिला मुळात अमेरिकेत स्थायिक व्हायचे होते आणि त्यातूनच तिने सगळे कुभांड रचले. पासपोर्टसंदर्भात घोळ केल्याचा आरोप केला जातो; परंतु माझ्या मुलींना त्या सज्ञान होईपर्यंत दुहेरी नागरिकत्व मिळते. त्यामुळे मी त्यांना अमेरिकेत घेऊन जाऊ इच्छित होते. पुढे त्या सज्ञान झाल्यावर त्यांना कुठल्याही एका देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याची मुभा आहे. यात घोळ करण्या सारखे काहीही नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले.
विदेशात भारतीय अधिकारी-कर्मचार्‍यांना चांगली वागणूक दिली जात नाही म्हणून ते भारतात परत येत आहेत का, असे विचारले असता तसे काही नाही. अनेक लोक भारतीय संस्कृतीचे आकर्षण असल्यामुळे परत येतात. आपल्या देशात येऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडण्याचा ते प्रयत्न करतात. गुणवत्ता असलेले अधिकारी-कर्मचारी जर परत येत असतील तर त्यात वाईट काहीही नाही, उलट ते देशाच्या भल्याचेच आहे, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भारत सरकारने नवीन पिढी सक्षम होण्यासाठी काय करायला हवे असे विचारले असता, खोब्रागडे यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्याला पदावरून हटविण्यात आले आहे, यावर आता आपली काय भूमिका असणार आहे, असे विचारल्यावर त्यांनी मला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यावर अन्याय झाल्यास मी नक्कीच न्याय मागेल असे सांगितले.
आदर्श प्रकरणात आपले व आपले वडील उत्तमराव खोब्रागडे यांचे नाव आले त्याबद्दल विचारले असता देवयानी यांनी आदर्श प्रकरणाची चौकशी सीबीआयने बंद केली आहे. माझा किंवा माझ्या वडिलांचा कुठलाही फ्लॅट आदर्शमध्ये नाही. मुंबईत सोसायटीत आमची मेंबरशिप आहे, ओनरशिप नाही, असे खोब्रागडे यांनी सांगितले. भविष्यात राजकारणात प्रवेश कराल का, असे विचारले असता त्यांनी असा कुठलाच विचार नाही. मला विदेश सेवेतच रुची आहे, असे त्यांनी सांगितले.

फोटो:देवयानी खोब्रागडे यांचा फाईल फोटो घ्यावा..
।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।।

Web Title: Central desk .... I have not committed any crime, I am not a criminal! Deviya Khobragade gave the explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.