शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट; महागाई भत्ता 12 टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 22:35 IST

1 कोटी कर्मचारी, पेन्शन धारकांना होणार फायदा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आधी 9 टक्के इतका होता. आता तो 12 टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी 2019 पासून याचा लाभ कर्मचारी आणि निवृत्ती वेतन घेणाऱ्यांना मिळेल. या लाभार्थींची संख्या 1 कोटी इतकी असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचं जेटली म्हणाले. त्यामुळे 1 जानेवारी 2019 पासून महागाई भत्ता 12 टक्के असेल. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 9168.12 कोटी रुपयांचा भार पडेल. याचा लाभ 48.41 लाख कर्मचाऱ्यांना, तर 62.03 लाख निवृत्ती वेतन धारकांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. लोकसभा निवडणुकीला काही दिवस राहिले असताना सरकारनं हा निर्णय घेतला आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानं काही महत्त्वाची विधेयकं मंजूर करता आली नाहीत. यातील काही विधेयकांना विरोधकांचाही पाठिंबा होता, असं जेटलींनी सांगितलं. यातील तीन विधेयकं अध्यादेशाच्या माध्यमातून लोकसभेत मांडण्यात आली होती. ती लोकसभेत मंजूरदेखील झाली. मात्र राज्यसभेत गदारोळामुळे ती मंजूर होऊ शकली नाहीत. त्यामुळे ही विधेयकं केंद्रीय मंत्रिमंडळानं यासाठीचे अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवले आहेत. लवकरच राष्ट्रपती त्यावर स्वाक्षरी करतील, असं जेटली म्हणाले. राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलेल्या अध्यादेशांमध्ये तिहेरी तलाकच्या अध्यादेशाचा समावेश आहे.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Employeeकर्मचारी