मध्य व पूर्व नागपुरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही
By Admin | Updated: December 27, 2014 23:38 IST2014-12-27T23:38:37+5:302014-12-27T23:38:37+5:30

मध्य व पूर्व नागपुरात मंगळवारी पाणी पुरवठा नाही
>नागपूर : लष्करीबाग व दक्षिण -पूर्व मध्य रेल्वेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर बोरियापुरा येथील गळती दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे मंगळवारी ३० डिसेंबरला मध्य व पूर्व नागपुरातील काही वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. याचा फटका प्रामुख्याने मोमीनपुरा, इतवारी , मस्कासाथ यासह आजूबाजूच्या वस्त्यांना बसणार आहे. दुरुस्तीचे काम २९ व ३० डिसेंबरला केले जाणार आहे. ते २४ तासात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २९ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता मुख्य फिडरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद होईल. याच दरम्यान गोळीबार चौकातील गळती दुरुस्तीचे काम के ले जाणार आहे. त्यामुळे लष्करीबाग, मोतीबाग, रेल्वे क्वॉर्टर, मेयो रुग्णालय, सैफिनगर, अन्सारनगर, डोबीनगर, हंसापुरी, भगवाघर, मोमीनपुरा, नालसाहब चौक, भानखेडा, टिमकी, गोळीबार चौक, समता बुद्ध विहार, गांजाखेत चौक, पाचपावली, तांडापेठ, बंगाली पंजा, मस्कासाथ, इतवारी, तेलीपुरा, लोहाओळ, रेशीमओळ, इतवारी रेल्वे स्टेशन, मारवाडी चौक आदी वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही. (प्रतिनिधी)