एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा वेग 130-140 पर्यंत वाढवण्याचा केंद्राचा विचार
By Admin | Updated: March 12, 2016 17:09 IST2016-03-12T15:45:22+5:302016-03-12T17:09:28+5:30
देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे

एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा वेग 130-140 पर्यंत वाढवण्याचा केंद्राचा विचार
>
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १२ - देशभरातील एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 130-140 किलोमीटर वाढवण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. सध्या एक्स्प्रेसवेवरील वाहनांचा सरासरी वेग ताशी 100 किलोमीटर आहे. देशभरात नव्याने मोठ्या प्रमाणात एक्स्प्रेसवे बांधण्यात येत असल्याने हा नियम बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.
याच आठवड्यात गुडगावमध्ये पार पडलेल्या गुंतवणुकदारांच्या परिषदेत नितीन गडकरी यांनी पादचा-यांना आणि धीम्या गतीच्या वाहनांना परवानगी नसलेल्या रस्त्यांवर भरधाव वेगात गाड्या चालवण्यासंबंधी बोलत हा नियम बदलण्याचे संकेत दिले होते.
यासाठी आम्ही वेगळा नियम आणणार आहोत. या रस्त्यांवर कमीत कमी एंट्री आणि एक्झिट पॉइंट असतील. शहरातील काही भागात आणि ठराविक ठिकाणच्या वाहनांच्या वेगाची पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नोंद केली आहे. निर्देशन देऊन स्पीड लिमिटवर वचक बसवण्याचा त्यांना अधिकार असेल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.
जगभरात सध्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे. जेणकरुन अपघातांवर नियंत्रण आणण्यात येईल. वाहनांमध्ये स्पीडोमीटर लावण्यावरुनदेखील चर्चा सुरु आहे. संपुर्ण वाहतूक व्यवस्थेला प्रगत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परमीट राज संपवणे हा यामागचा उद्धेश आहे. आम्ही राज्यातील अनेक महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करत आहोत जेणेकरुन केंद्राची गुंतवणुक वापरुन त्यांचा विस्तार करता येईल. त्यामुळे वाहनांची गती आणि सुरक्षादेखील वाढवता येईल असं मत गडकरी यांनी नोंदवलं आहे.