शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सर्व ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे तीन वर्षांत विद्युतीकरण करण्यास केंद्राचा हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:36 IST

भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या देशभरातील अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या १३,६७५ किमीच्या मार्गांचे विद्युतीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.या कामास १२,१३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ब्रॉडगेज रेल्वेमार्गांचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्यावर रेल्वेच्या इंधनावरील खर्चात दरवर्षी १३,५१० कोटी रुपयांची बचत होईल, असे मंत्रिमंडळ बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले. हे विद्युतीकरणाचे काम सन २०२१-२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक वाहतूक असलेल्या सर्व महत्त्वाच्या रेल्वेमार्गांचे याआधीच विद्युतीकरण झालेले आहे. मात्र अधल्या-मधल्या व अगदी टोकाच्या काही मार्गांचे विद्युतीकरण झालेले नसल्याने त्याठिकाणी सध्या इंजिने बदलावी लागतात. पूर्ण विद्युतीकरण झाल्यावर रेल्वेची कार्यक्षमता, वेग, सुरक्षतता व वहनक्षमता वाढेल.सध्या रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीपैकी सुमारे ७५ टक्के व प्रवासी वाहतुकीपैकी निम्म्याहून अधिक वाहतूक विजेवर चालणाऱ्या गाड्यांनीच होत असली तरी एकूण इंधनामध्ये विजेचा वाटा फक्त ३७ टक्के आहे. विजेचा वापर वाढल्यावर डिझेलचा वापर २.८३ अब्ज लिटरने कमी होईल व साहजिकच एकूण इंधनखर्चातही बचत होईल. या विद्युतीकरणाच्या कामाने २०.४ कोटी नवे थेट रोजगार उपलब्ध होतील, असेही सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी