शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी केंद्राचा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 5:26 AM

अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी आलेल्या नि:शुल्क शिकवणीच्या सुधारित योजनेनुसार आता दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी आलेल्या नि:शुल्क शिकवणीच्या सुधारित योजनेनुसार आता दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा भार केंद्र सरकार उचलणार आहे. याआधी केंद्र सरकार शिकवणी शुल्काच्या कमाल २० हजार रुपयांपर्यंतचा खर्च सहन करीत होते.सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने केंद्रीय क्षेत्र योजनेत दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीअंतर्गत केंद्र सरकार अनुसूचित जाती (एससी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची शिकवणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिष्ठित कोचिंग संस्थांना सूचीबद्ध करणार आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.याआधी केंद्र सरकारतर्फे कोचिंग संस्थांना प्रति विद्यार्थी २० हजार रुपये शिकवणी शुल्क म्हणून दिले जात होते. परंतु यापुढे सरकार एससी व ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांचा संपूर्ण शिकवणीचा खर्च सहन करणार आहे. (वृत्तसंस्था)याशिवाय स्थानिक विद्यार्थ्यांना दिले जाणारे मासिक विद्यावेतन १,५०० रुपयांवरून वाढवून २,५०० रुपये करण्यात आले आहे. राज्याबाहेरील विद्यार्थ्यांचे मासिक विद्यावेतन ३,००० रुपयांवरून ५,००० रुपये करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मासिक २,००० रुपयांचा विशेष भत्ता दिला जाणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.