शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा मोठा निर्णय, खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ होणार सरकारी अधिकारी; लोकसेवा आयोगाकडून होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 07:30 IST

"१२ सरकारी खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती."

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची केंद्रीय खात्यांमध्ये संयुक्त सचिव, संचालक, उपसचिव या पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. 

ते म्हणाले, १२ सरकारी खात्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करावी, अशी मागणी केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली होती. कृषी, नागरी हवाई वाहतूक, रसायने व खते, सार्वजनिक वितरण, अवजड उद्योग, शिक्षण खात्यातील उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता हे विभाग, गृहनिर्माण व नगरविकास, वाणिज्य, विधि आदी खात्यांमध्ये ही भरती होणार आहे. याआधी संयुक्त सचिव, संचालक, उपसचिवपदांवर आतापर्यंत अ श्रेणीतील अधिकारी नेमण्यात येत असत.

या पदांची जाहिरात २० मे रोजी यूपीएससी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल. इच्छुक उमेदवार २० मे ते १९ जून या कालावधीत अर्ज करू शकतात. किती पदांवर भरती होणार आहे, याचा तपशील जाहिरातीत देण्यात येणार आहे. 

तिसरी भरती मोहीमकेंद्रीय खात्यांमध्ये संयुक्त सचिवपदाच्या १० जागांवर भरती करण्यासाठी कार्मिक खात्याने पहिल्यांदा २०१८ साली खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अर्ज मागविले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे त्या पदांवर भरती करण्यात आली. २०२१ साली केंद्र सरकारने विविध खात्यांमधील ३ संयुक्त सचिव, १९ संचालक, ९ उपसचिव या पदांसाठी भरती केली होती. आता तिसऱ्यांदा अशाच पद्धतीने भरती होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाEmployeeकर्मचारी