औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास केंद्र सरकार ६ हजार कोटी रुपये गुंतवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:22 IST2017-10-26T04:22:18+5:302017-10-26T04:22:36+5:30
शिलाँग : देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास जागतिक बँकेच्या साह्याने ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करील, असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्यविकास व उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास केंद्र सरकार ६ हजार कोटी रुपये गुंतवणार
शिलाँग : देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास जागतिक बँकेच्या साह्याने ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केंद्र सरकार करील, असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्यविकास व उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले.
हेगडे यांनी सांगितले की, आयटीआय संस्था देशातील समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत, तसेच ग्रामविकास गटापर्यंत पोहोचविण्याची सरकारची इच्छा आहे. आयटीआय संस्थांना मजबूत करण्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे. त्या अंतर्गत जागतिक बँकेच्या सहकार्याने ६ हजार कोटी रुपये या संस्थांत गुंतविण्यात येतील.