केंद्रानेही नेताजींसंदर्भातल्या फायली खुल्या कराव्यात - ममता बॅनर्जी
By Admin | Updated: September 18, 2015 14:14 IST2015-09-18T14:06:52+5:302015-09-18T14:14:13+5:30
सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावी

केंद्रानेही नेताजींसंदर्भातल्या फायली खुल्या कराव्यात - ममता बॅनर्जी
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १८ - सत्य कधीही लपून राहत नाही, आणि ते कधी लपवूही नये असे सांगत आता केंद्र सरकारनेही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातली आत्तापर्यंत गोपनीय ठेवलेली कादगपत्रे खुली करावीत असे आवाहन केले. नेताजींबद्दल केवळ बंगालीच नाही तर संपूर्म भारतीय जनतेला आदर असून त्यांच्या संदर्भातली खरी माहिती समोर आली तर त्यात गैर काय आहे असा सवालही ममतांनी विचारला आहे. सुभाषचंद्र बोस हे १९४५ साली विमान अपघातात मरण पावले अशी मान्यता आहे, परंतु सरकारी कादगपत्रांमध्ये असलेल्या अहवालांमध्ये बोस यांच्या संदर्भातली अनेक सत्ये दडलेली असून वेगळाच घटनाक्रम पुढे येईल असा काहीजणांचा दावा आहे. पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या ताब्याती ल ६५ फायली सोमवारपासून जनतेसाठी खुल्या केल्या जाणार असून आज त्या फायली बोस यांच्या वंशजांकडे सुपूर्त केल्या आहेत.
केंद्र सरकारच्या ताब्यातही जवळपास १३० फायली नेताजींसंदर्भातल्या असून नेताजींच्या शेवटच्या प्रवासावर प्रकाश पडेल अशी शक्यता आहे. अमेरिकी तसेच ब्रिटिश संस्थांनी तयार केलेल्या अहवालांचा यात समावेश आहे. हे अहवाल खुले केले तर काही देशांशी भारताचे संबंध बिघडतिल अशी भीती व्यक्त करण्यात येत असली तरी ही भीती निराधार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. जे सत्य आहे ते समोर यायला हवे आणि केंद्र सरकारनेही आपल्यासारखीच भूमिका घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले आहे.