शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची सट्टेबाजांवर कारवाई; महादेव अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर अ‍ॅप्स, वेबसाईट ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 23:15 IST

ईडीच्या विनंतीवरून मंत्रालयाने महादेव अ‍ॅपसह २२ अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत.

नवी दिल्ली – माहिती तंत्रज्ञान आणि प्रसारण मंत्रालयाने महादेव अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. बेकायदेशीर सट्टेबाजी अ‍ॅप सिंडिकेटच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर त्यानंतरच्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्याने अ‍ॅपचे बेकायदेशीर ऑपरेशन उघड केले आहे. महादेव बुकचा मालक सध्या कोठडीत आहे, त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम १९ अंतर्गत मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली आहे, जी PMLA, २००२ च्या कलम ४ अंतर्गत दंडनीय आहे.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, "छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट/अ‍ॅप बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार होता. गेल्या दीड वर्षांपासून त्याची चौकशी सुरू आहे. खरं तर, ईडीकडून ही पहिली विनंती करण्यात आली असून त्यावरून पुढील कारवाई केली गेली.

२२ बेकायदेशीर अ‍ॅप्स-वेबसाइट्स ब्लॉक

ईडीच्या विनंतीवरून मंत्रालयाने महादेव अ‍ॅपसह २२ अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. छत्तीसगड सरकारला आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत वेबसाइट बंद करण्याची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्हाला ईडीकडून शिफारस मिळाल्यानंतर ही ब्लॉकची कारवाई करण्यात आली आहे असं राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.

काही महिन्यांतच देशभरातील १२ लाखांहून अधिक लोक महादेव बुक नावाच्या या अ‍ॅपमध्ये सामील झाले होते आणि याद्वारे लोकांनी क्रिकेटपासून निवडणुकीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर कोरोना महामारीनंतर या अ‍ॅपचा व्यवसाय खूप वेगाने वाढला.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय