शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

केंद्रानं 100 टक्के एफडीआयसाठी संरक्षण व नागरी विमान वाहतूक क्षेत्रं केली खुली

By admin | Updated: June 20, 2016 16:19 IST

केंद्र सरकारनं संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांत 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20 - आर्थिक सुधारणांवर भर देत मोदी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनं संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक या क्षेत्रांत 100 टक्के परदेशी गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात परदेशी उद्योजकांना सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

इतर क्षेत्र म्हणजेच फूड, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सींना परदेशी गुंतवणुकीसाठी सूट देण्यात आली आहे. स्वयंचलित मार्ग आणि इतर क्षेत्रही परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केल्याची माहिती यावेळी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. भारतातील रोजगार आणि रोजगार निर्मिती प्रमुख क्षेत्रांना उत्तेजन देण्यासाठी उदारीकरणासाठी व्यापक धोरण अवलंबण्याचाही सरकार विचार करत असून, ही क्षेत्रही थेट परदेशी गुंतवणुकीसाठी खुली करण्याचा केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. नागरी उड्डाण वाहतूक, विमा, ई- कॉमर्स, पेन्शन, फार्मास्युटिकल ही क्षेत्रही 100 टक्के खुली केल्यानं या क्षेत्रातही थेट परदेशी गुंतवणूक करता येणार आहे.

परदेशी गुंतवणुकीसाठी भारतीय अर्थव्यवस्था सर्वात खुली अर्थव्यवस्था- नरेंद्र मोदी

भारत ही आशियातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून, आम्ही ही अर्थव्यवस्था 100 टक्के परदेशी गुंतवणुकीसाठी खुली केल्याची माहिती मोदींच्या पंतप्रधान कार्यालयानं टि्वट करून दिली आहे.