शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:36 IST

Census 2027 : देशात जात जनगणना आणि जनगणना करण्यासाठी अधिकृत अधिसूचना सोमवारी जारी करण्यात आली. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असेल. यासाठी मोबाईल अ‍ॅप्स तयार केले जाणार आहेत.

देशात गेल्या काही महिन्यांपासून जात जनगणना आणि जनगणनेची चर्चा सुरू आहे. यासाठी राजपत्रित अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसंख्येची जनगणना २०२७ या वर्षात केली जाणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, महापंजीयन आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. सरकारी निवेदनानुसार, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप्स तयार केले जातील आणि त्यामध्ये जनगणनेशी संबंधित सर्व माहिती गोळा केली जाईल. हे अ‍ॅप्स १६ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?

याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांनी सोश मिडिया पोस्ट शेअर केली. यामध्ये म्हटले की, '१६ व्या जनगणनेत पहिल्यांदाच जातगणनेचा समावेश असेल. ३४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक, १.३ लाख जनगणना अधिकारी आधुनिक मोबाईल आणि डिजिटल उपकरणांसह हे काम करतील. जम्मू-काश्मीर आणि लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून आणि देशातील उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जातीगणना आणि जनगणनेचे काम सुरू होईल.'

जनगणना दोन टप्प्यात होणार

जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच घरांची यादी आणि गृहनिर्माण गणना (HLO), प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाईल. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात (लोकसंख्या गणना), प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाणार आहे.

स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना

ही जनगणना भारताची १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना असेल. यावेळी जनगणना मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. नागरिकांसाठी स्व-गणना सुविधा देखील उपलब्ध असेल. डेटा सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संकलन, प्रसारण आणि साठवणूक करताना कडक सुरक्षा उपाययोजना केल्या जातील. शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती आणि ही जनगणना १६ वर्षांच्या अंतरानंतर केली जाणा आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शाह