देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत जनगणनेबद्दल महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. २०२७ मध्ये होणारी राष्ट्रीय जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कागदोपत्री माहिती संकलन न करता मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे.
लोकसभेमध्ये मंगळवारी सनातन पांडे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली.
लोक स्वतः माहिती भरू शकतील
२०२७ मध्ये जनगणना करण्यासाठी एक विशेष डिजिटल पोर्टल तयार केले जात आहे. त्या माध्यमातून संपूर्ण देशातील जनगणनेच्या प्रक्रियेवर देखरेख आणि व्यवस्थापन केले जाईल. लोक त्यांची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने भरू शकतील. तर फिल्ड अधिकारी मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती गोळा करू शकतील, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी दिली.
कशी केली जाणार जनगणना?
राय यांनी सांगितले की, जनगणना सुरू होण्यापूर्वी एक प्रश्नावली केंद्र सरकारकडून राजपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व्हावी हे निश्चित करण्यासाठी आणि सर्व राज्यांना आणि यंत्रणांना तयारी करण्यासाठी अनिवार्य आहे.
डिजिटल जनगणनेमुळे माहितीवर प्रक्रिया करण्याला वेग येईल. चुका कमी होतील आणि अंतिम अहवाल पूर्वीच्या तुलनेत जास्त विश्वसनीय आणि वेळेच्या आत उपलब्ध होऊ शकेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, डिजिटल माध्यमातून जनगणना ही भविष्यातील धोरणे, शहर योजना, अंदाज आणि सामाजित आर्थिक पाहण्या व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
देशात शेवटची जनगणना २०११ मध्ये झाली होती. २०२१ मधील जनगणना कोरोनाच्या साथीमुळे स्थगित केली गेली होती. त्यानंतर आता जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन टप्प्यात देशात जनगणना होणार आहे.
Web Summary : India's 2027 census will be fully digital, using a mobile app and web portal for data collection. Citizens can self-report information online. This digital approach promises faster processing, fewer errors, and more reliable results, aiding future planning.
Web Summary : भारत की 2027 की जनगणना पूरी तरह से डिजिटल होगी, जिसमें डेटा संग्रह के लिए एक मोबाइल ऐप और वेब पोर्टल का उपयोग किया जाएगा। नागरिक ऑनलाइन जानकारी स्वयं भर सकते हैं। यह डिजिटल दृष्टिकोण तेजी से प्रसंस्करण, कम त्रुटियों और अधिक विश्वसनीय परिणामों का वादा करता है, जो भविष्य की योजना बनाने में सहायक है।