शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

देशभर सिमेंटचेच रस्ते

By admin | Updated: September 16, 2014 00:45 IST

यापुढे देशभर सिंमेट काँक्रिटचेच रस्ते असतील अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली.

नवी दिल्ली : यापुढे देशभर सिंमेट काँक्रिटचेच रस्ते असतील अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. त्याखेरीज मनरेगा फक्त आदिवासी आणि मागास भागापुरतीच मर्यादित ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  
ग्रामविकास, महामार्ग व वाहतूक तसेच जहाजबांधणी मंत्रलयाच्या शंभर दिवसांच्या  कामकाजाचे प्रगतीपुस्तक  देशापुढे सादर करण्यासाठी राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकारपरिषदेत गडकरी बोलत होते. शंभर दिवसांत झालेल्या कामकाजाची माहिती त्यांनी चित्रफितीतून दिली. देशाच्या अन्य राज्यातील पत्रकारांनाही कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून जोडले गेले होते.  महाराष्ट्रात निवडणुका असल्याने त्यांनी राज्याच्या संबंधित माहिती दिली नाही व कोणतीच घोषणा केली नाही. मात्र काही निर्णय जे यापूर्वीच सांगण्यात आले त्याचा पुनरूच्चर केला. गडकरी म्हणाले, स्वच्छ व शुध्द जल तसेच स्वच्छता या विषयांना प्राधान्य दिले असून, येत्या 2 आक्टोबरपासून पुढील पाच वर्षे भारत स्वच्छता अभियान जनचळवळ राबविली जाईल. ज्या भागात शेती आणि एकूणच विकास नीट झाला आहे आणि जेथे दरडोई उत्पन्न पुरेसे आहे, अशा भागांऐवजी ख:या अर्थाने मागास आणि आदिवासीबहुल क्षेत्रतच मनरेगा सुरू ठेवण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित असलेल्या जलवाहतूक विभागाला मोलाचे स्थान प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत असतानाच त्यांनी मोठय़ा जहाजांच्या परिचालनासाठी हिंदूंचा श्रद्धाविषय असलेला राम सेतू पाडण्याचा कोणताही इरादा नसल्याचे सांगितले. मोटार वाहन कायदा लवकच प्रत्यक्षात येणार, रस्ते बांधणीत परदेशी गुंतवणूक, खासदारांना मतदारसंघातील माहिती देणार, बेशिस्त वाहतुकीला कॅमेरांचा ब्रेक,  दररोज 3क् कि.मी.रस्ते बांधणी, यापुढे पूल -कम- बंधारा,महामार्गावर 5क्क् आधुनिक विश्रंतीगृहे, नक्षली भागात रस्त्यांसाठी नवी योजना अशा विषयांचा तपशील गडकरींनी दिला. 
 
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नांनागडकरींनी 
बगल दिली. ते म्हणाले, जेव्हा महाराष्ट्रात होतो, तेव्हा दिल्लीत कशाला आले म्हणून विचारायचे आता केंद्रात आहे, तर महाराष्ट्रात जाता का म्हणून कल्पना करता, तुम्हीच ठरवा मी कुठे जायचे ते, असे ते म्हणाले.
 
बॅलार्ड इस्टेटची लीज वसूल करणार
मुंबईतील बॅलार्ड इस्टेटची जागा जहाजबांधणी मंत्रलयाची असल्याने 
तेथे बांधण्यात आलेल्या इमारतींकडून लिज वसुल करण्यात 
येणार आहे. ती साधारणत: अडीच हजार कोटींची असेल, असे 
गडकरी म्हणाले.