कानिफनाथ यात्रा महोत्सव उत्साहात
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
बाळापूर : नजीकच्या मनारखेड येथे मन नदीच्या काठावर कानिफनाथांचे भक्त स्व. लाडुबुवा महाराज यांच्या समाधीस्थळावर ९ व १० फेब्रुवारी रोजी कानिफनाथ यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.

कानिफनाथ यात्रा महोत्सव उत्साहात
ब ळापूर : नजीकच्या मनारखेड येथे मन नदीच्या काठावर कानिफनाथांचे भक्त स्व. लाडुबुवा महाराज यांच्या समाधीस्थळावर ९ व १० फेब्रुवारी रोजी कानिफनाथ यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. स्व. लाडुबुवा महाराजांच्या या समाधीस्थळावर दरवर्षी दोन दिवसांचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानुसार या यात्रेस भाविक मोठ्या संख्येने आले होते. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवादरम्यान गजानन पाटील व मनोहर पाटील यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व गावकर्यांच्या सहकार्याने हा यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पडला. (तालुका प्रतिनिधी)०००००००००००००००००००००००००००००००