डिचोली तालुक्यात महाशिवरात्री भक्तीपूर्ण वातावरणात साजरी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30

डिचोली : हजारो शिवभक्त उपासकांनी शिवरात्रीनिमित्त हरवळे येथील प्रसिद्ध रुद्रेश्वर मंदिरात महाभिषेक करून तसेच प्रसिद्ध तीर्थस्थान करून शिवभक्ती केली.

Celebrated in Mahishivratri devotional atmosphere in Dicholi taluka | डिचोली तालुक्यात महाशिवरात्री भक्तीपूर्ण वातावरणात साजरी

डिचोली तालुक्यात महाशिवरात्री भक्तीपूर्ण वातावरणात साजरी

चोली : हजारो शिवभक्त उपासकांनी शिवरात्रीनिमित्त हरवळे येथील प्रसिद्ध रुद्रेश्वर मंदिरात महाभिषेक करून तसेच प्रसिद्ध तीर्थस्थान करून शिवभक्ती केली.
हरवळे येथे पहाटेपासूनच रुद्रेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. पवित्र स्थान तसेच आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी मोठी गर्दी लोटली होती.
दुग्धाभिषेक, महाअभिषेक तसेच विविध धार्मिक विधी यावेळी भाविकांनी करून घेण्यासाठी गर्दी केली होती.
सुर्ल महादेव मंदिर, वाठादेव येथील वाठारेश्वर मंदिर, आंबेली सत्तरी येथील महादेव ंदिर, तसेच वडावल, नानोडा, लाडफे, कुडणे, डिचोली व विविध ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरात शिवभक्तांनी भक्तीपूर्ण अंत:करणाने सेवा करून अभिषेक केला. यानिमित्त सर्वच मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी लोटली होती. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
वाहतूक व्यवस्था व भाविकांना दर्शन घेण्यासाठी पोलीस तसेच देवस्थानचे अधिकारी कार्यरत होते. शिवभक्तीचा हा अपूर्व सोहळा मंगलमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत चालू होता. (प्रतिनिधी)
फोटो ओळी-
१) हरवळे येथे रुद्रेश्वर मंदिरात दुग्धाभिषेक चालू असताना झालेली भाविकांची गर्दी. २) भाविकांच्या रांगा. ३) तीर्थस्थळी पवित्र स्थान करताना भाविक. ४) उत्सवानिमित्त भरलेली फेरी. (सर्व छाया : विशांत वझे)

Web Title: Celebrated in Mahishivratri devotional atmosphere in Dicholi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.