युगनायक गोवातर्फे बुध्द जयंती उत्साहात साजरी
By Admin | Updated: May 5, 2015 01:22 IST2015-05-05T01:22:08+5:302015-05-05T01:22:08+5:30
पणजी : युगनायक गोवा संस्थेतर्फे गौतम बुध्द जयंती दि. ४ रोजी, श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. या वेळी डॉ. उल्हास चांदेलकर, जयप्रभू कांबळे, अध्यक्ष परेश पारवाल, कार्यक्रम अध्यक्ष गणेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते. जयप्रभू कांबळे यांनी सांगितले की, जीवनातील दुख नष्ट करण्यासाठी अष्टांग मार्गाचा स्वीकार करावा. स्त्री-पुरूष मध्ये समानता केल्यास लिंगभेद नष्ट होईल. प्रत्येकाने समाजासाठी वेळ दिला पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये आपुलकी निर्माण करता येईल. माणसाने पैशांचा हेवा करता कामा नये. त्यापेक्षा सत्य व बुध्द धर्माचे आचरण करावे. असे त्यांनी बोलताना सांगितले.

युगनायक गोवातर्फे बुध्द जयंती उत्साहात साजरी
प जी : युगनायक गोवा संस्थेतर्फे गौतम बुध्द जयंती दि. ४ रोजी, श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात साजरी करण्यात आली. या वेळी डॉ. उल्हास चांदेलकर, जयप्रभू कांबळे, अध्यक्ष परेश पारवाल, कार्यक्रम अध्यक्ष गणेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते. जयप्रभू कांबळे यांनी सांगितले की, जीवनातील दुख नष्ट करण्यासाठी अष्टांग मार्गाचा स्वीकार करावा. स्त्री-पुरूष मध्ये समानता केल्यास लिंगभेद नष्ट होईल. प्रत्येकाने समाजासाठी वेळ दिला पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये आपुलकी निर्माण करता येईल. माणसाने पैशांचा हेवा करता कामा नये. त्यापेक्षा सत्य व बुध्द धर्माचे आचरण करावे. असे त्यांनी बोलताना सांगितले.