पोलिसांच्या बंदोबस्तात व्हॅलेंटाइन साजरा
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:13+5:302015-02-14T23:52:13+5:30
नाशिक : तरुणाईने गजबजलेला कॉलेज कॅम्पस, गिफ्टची रेलचेल, रंगीबेरंगी फुलं आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात तरुणाईने व्हॅलंेटाइन डे साजरा केला.

पोलिसांच्या बंदोबस्तात व्हॅलेंटाइन साजरा
न शिक : तरुणाईने गजबजलेला कॉलेज कॅम्पस, गिफ्टची रेलचेल, रंगीबेरंगी फुलं आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात तरुणाईने व्हॅलंेटाइन डे साजरा केला. प्रेमीयुगलांना आपल्या भावना आणि साथीदाराबद्दल असणारे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे, मात्र गेल्या काही वर्षांपासून राजकीय संघटनांनी या दिवसाला विरोध केल्याने व्हॅलेंटाइन डे हा दिवस वादाच्या भोवर्यात सापडला आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यादिवशी विशेष खबरदारी बाळगतात. आज दिवसभर शहरात विविध कॉलेज परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. एचपीटी, आरवायके, बीवायके, केटीएचएम, भोसला, बिटको आदि कॉलेजच्या भागात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला होता. त्याचबरोबर काही महाविद्यालयांनी सुरक्षारक्षकांचा कॅम्पस परिसरात बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे बहुतेक तरुणांनी कॉलेजमध्ये अनुपस्थिती दर्शवित गिफ्ट गॅलरी, मॉल, हॉटेल्स, पर्यटनस्थळे याठिकाणी व्हॅलेंटाइन डे साजरा केला. ---इन्फोसोशल मीडियावर व्हॅलेंटाइन डेव्हॉट्स ॲप, फेसबुक, हाईक अशा सोशल मीडियाच्या माध्यमांचा उपयोग करत तरुणाईने व्हॅलंेटाइन डे साजरा केला. दिवसभर विविध पोस्ट तसेच प्रेमाचे संदेश एकमेकांना शेअर करण्यात आले. फोटो क्रमांक : १४पीएएफबी११४