उमवि प्रशाळेत मात्रृभाषा दिवस साजरा
By Admin | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:26+5:302016-02-23T00:03:26+5:30
जळगाव : उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी २१ रोजी मातृभाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभाषेतून कविता,गीत, रीतीरिवाजांची माहिती, विचार अशा विविध कार्यक्रम सादर केले.

उमवि प्रशाळेत मात्रृभाषा दिवस साजरा
ज गाव : उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी २१ रोजी मातृभाषा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातृभाषेतून कविता,गीत, रीतीरिवाजांची माहिती, विचार अशा विविध कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ.म.सु.पगार होते.अतिथी औरंगाबाद विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन संचालक प्रा.ए.जी.खान होते. यावेळी खान यांनी, मूलभूत विचार मातृभाषेतूनच केला जात असतो. त्यामुळे ज्ञाननिर्मिती ही मातृभाषेतूनच व्हायला हवी. इंग्रजी ही जरी ज्ञानभाषा असली तरी तीचे अतिरेकी अनुकरण करु नका. भोवतालाशी जोडलेले राहायचे असले तर मातृभाषा सांभाळायला हव्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी डॉ. पगार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ.शोभा शिंदे, डॉ.मुक्ता महाजन, डॉ. सुनील कुलकर्णी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.आशुतोष पाटील यांनी केले. सुत्रसंचालन नरेश पवार या विद्यार्थ्यांने तर आभार कालूसिंग वळवी याने मानले.आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा २७ पासूनजळगाव : उमवि विद्यार्थी कल्याण विभागातर्फे २७ व २८ रोजी आयएमआर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजत करण्यात आले आहे. स्पर्धेत महाविद्यालय एक संघ सहभागी घेऊ शकेल. २६ फेब्रुवारीपूर्वी महाविद्यालयांनी प्रवेशीका जमा करावयाच्या आहेत. विजेत्यांसाठी सांघिक प्रथम पारितोषिक ५००१ रुपये चषक,प्रशस्तीपत्र व मानचिन्ह, द्वितीय ३००१ रुपये, तृतीय २००१ रुपये आणि उत्तेजनार्थ १००१ रुपये असे पारितोषिकांचे स्वरुप असेल. यासह दिग्दर्शन, लेखन,अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा अशी वौयक्तिक पारितोषिकेही दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा.व्ही.व्ही.काटदरे, प्रा.योगेश पाटील यांच्याशी संपर्क करण्यचे आवाहन विद्यार्थी कल्याण विभाग संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनी केले आहे.