शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एलओसीवरील गोळीबाराविरोधात भारत आक्रमक; पाकिस्तानी राजदूतांना समन्स

By कुणाल गवाणकर | Updated: November 15, 2020 08:02 IST

पाकिस्तानकडून दिवाळीच्या पूर्वसंध्येला नियंत्रण रेषेवर बेछूट गोळीबार

नवी दिल्ली: नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भारताकडून समन्स बजावण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा निषेध केला आहे.‘’भारताने CEPC उद्ध्वस्त करण्यासाठी ८० अब्ज दिले, रॉ ने ७०० दहशतवादी तयार केले’’पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून भारताच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना नाहक लक्ष्य केलं जात आहे. त्याबद्दल भारतानं अतिशय कठोर शब्दांत आपला निषेध नोंदवला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. 'उत्सव काळात नियंत्रण रेषेवर सुरू असलेला बेछूट गोळीबार आणि त्या माध्यमातून शांतता भंग करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या 'चार्ज डी अफेयर्स'ना समन्स बजावण्यात आलं. सीमेवर पाकिस्तानकडून विनाकारण सुरू असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा निषेध त्यांच्या समक्ष करण्यात आला,' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली.भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुलीसीमेपलीकडून दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कर अगदी उघडपणे मदत करत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं. पाकिस्तानी सैन्यानं शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरपासून गुरेज सेक्टरपर्यंत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात ५ जवान शहीद झाले. याशिवाय ११ नागरिकांचा मृत्यू झाला.पाकिस्तानच्या नापाक कारवायांना भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. भारतीय सैन्याच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे ११ सैनिक मारले गेले आणि १२ जण जखमी झाले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्च पॅडदेखील उद्ध्वस्त झाले.

टॅग्स :Ceasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान