शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जनरल बिपिन रावत यांची 'ही' इच्छा राहिली अपुरी, काकांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2021 12:22 IST

जनरल बिपीन रावत यांचे काका भरतसिंह रावत उत्तराखंडमधील सायना या गावात राहतात. त्यांनी बिपीन रावत यांची एक इच्छा अपुरी राहिल्याची माहिती दिली.

पौडी: काल तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातातमृत्यू झाला. त्यांच्यासोबत पत्नी आणि इतर 11 अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. जनरल बिपिन रावत यांची एक मोठी इच्छा अपुरी राहिली आहे. बिपीन रावत यांचे काका निवृत्त हवालदार भरतसिंह रावत(70) उत्तराखंडमधील सायना या त्यांच्या मूळ गावी राहतात. त्यांनी बिपीन रावत यांच्या इच्छेबद्दल माहिती दिली.

भरतसिंह रावत यांनी सांगितले की, बिपीन रावत यांची एक मोठी इच्छा होती, ही इच्छा आता अपुरी राहणार आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, बिपीन रावत यांना सायना या त्यांच्या मूळ गावी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधायचे होते. जनरल रावत यांच्या या सायना गावात फक्त त्यांच्या काकांचे कुटुंब राहते. सायना गावात एकूण तीन घरे असून, त्यापैकी एका घरात काकांचे कुटुंबीय आहे, तर उर्वरित दोन घरे रिकामी आहेत.

रावत कुटुंब दुःखातभरत सिंह रावत यांना बिपीन रावत यांच्याबद्दल बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांनी सांगितले की, बिपीन रावत हे त्यांच्या गावाशी आणि घराशी खूप जोडलेले होते. अनेकदा त्यांच्याशी फोनवरही बोलत असत. जनरल रावत यांनी आपल्या काकांना सांगितले होते की, ते एप्रिल 2022 मध्ये गावी परतणार आहेत आणि गावात एक घर बांधायचे आहे. डोळ्यातील अश्रू पुसत भरतसिंह रावत म्हणाले की, आपल्या पुतण्याची ही इच्छा आता अपूर्ण राहणार आहे.

वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधायचे होते

त्यांनी सांगितले की जनरल रावत लष्करप्रमुख झाल्यानंतर एप्रिल 2018 मध्ये शेवटचे त्यांच्या गावात आले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवृत्त झाल्यानंतर गावात घर बांधून गावातील शांत वातावरणात राहण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. जनरल रावत यांच्या निधनामुळे संपूर्ण रावत कंटुबासह गावात शोककळा पसरली आहे. आजुबाजूच्या गावातून लोक येऊन भेट घेत आहेत. उद्या दिल्लीत जनरल रावत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होईल. 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतAccidentअपघातDeathमृत्यूHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना