शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:56 IST

CDS Anil Chauhan on Operation Sindoor:'शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गरजेचे.'

CDS Anil Chauhan on Operation Sindoor: भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारेपाकिस्तानवर जोरदार कारवाई केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी, 'ऑपरेशन सिंदूर' अजून थांबले नाही. देशाचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी आज याबाबत महत्वाचे अपडेट दिले आहे. ते म्हणाले की 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे. सैन्याला नेहमीच सतर्क राहावे लागते.

अनिल चव्हाण म्हणाले, आजचे युद्ध पारंपारिक आणि आधुनिक पद्धतींचे मिश्रण आहे. यामध्ये गतिज (शस्त्रांवर आधारित) आणि गैर-गतिज (माहितींवर आधारित) दोन्ही रणनीतींचा समावेश आहे. हे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीच्या युद्ध तंत्रांचे समन्वय आहे. युद्धासाठी शास्त्र आणि शस्त्र (ज्ञान) दोन्ही आवश्यक आहेत. ऑपरेशन सिंदूर अजूनही थांबलेले नाही. सैन्याने सर्व परिस्थितीत २४x७, ३६५ दिवस तयार असले पाहिजे. 

ऑपरेशन सिंदूर बद्दल संसदेत देण्यात आलेली माहितीगुरुवारी राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दिलेला प्रत्युत्तर म्हणजून ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी सुरू करण्यात आले होते. ही कारवाई दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे आणि दहशतवाद्यांना मारणे यावर केंद्रित होती. ऑपरेशन सिंदूर आंतरराष्ट्रीय दबावाखाली सुरू करण्यात आले होते का? असे सरकारला विचारले असता, परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, ही भारताची उत्स्फूर्त आणि ठोस प्रतिक्रिया होती. यात आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता.

भारतीय हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी ठार केले. जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भारताने पाकिस्तानी हवाई तळ आणि लष्करी तळांवरही हल्ला केला. 

१० मे रोजी युद्धविरामचार दिवसांच्या संघर्षानंतर पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी भारतीय लष्करप्रमुखांना युद्धविरामाची विनंती केली. त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान