शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Burari Deaths: कुटुंबानं स्वत:चं आणलं आत्महत्येचं सामान; 11 मृत्यूंचं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 10:16 IST

सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना मिळाली महत्त्वपूर्ण माहिती

दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बुरारीमधील 11 आत्महत्यांचं गूढ आता हळूहळू उकलताना दिसतं आहे. बुरारीच्या संतनगरमध्ये एकाच घरात 11 मृतदेह आढळले होते. या आत्महत्या आहेत की हत्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्यांनीच आत्महत्येसाठी वापरलेलं सामान घरात आणल्याचं स्पष्ट दिसतं आहे. बुरारीतील भाटिया कुटुंबामधील 11 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली होती. कोणीतरी व्यवस्थित नियोजन करुन संपूर्ण कुटुंबाला संपवलं असावं, अशी शक्यता भाटिया कुटुंबाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाटिया कुटुंबातील सदस्य टेबल आणि वायर दुकानातून आणताना दिसत आहेत. याच टेबल आणि वायरचा वापर करुन या कुटुंबानं स्वत:ला संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा होता. यामध्ये भाटिया कुटुंबाची मोठी सून सविता आणि त्यांची मुलगी नीतू पाच टेबल आणताना दिसत आहे. याच टेबलांच्या आधारे संपूर्ण भाटिया कुटुंबानं गळफास लावून घेतला. भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला. विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.  

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूdelhiदिल्लीCrimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली