शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

एकानं तारा हलवल्या अन् एका क्षणात कोसळला मोरबीचा झुलता पूल; CCTV मध्ये थरारक घटना कैद, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 12:03 IST

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोरबी : 

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक झुलता पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता अचानक कोसळला. त्या पुलावरील सुमारे ५०० हून अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.  

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुलावर असलेले काही जण पुलाच्या तारा हलवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही टवाळखोरांच्या उपद्रवामुळे ही घटना घडली तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आला आहे.

बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

नुकतीच झाली होती दुरूस्तीमोरबी येथील पूल रविवारी कोसळला तेव्हा त्यावर शेकडो लोक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नुकताच नूतनीकरण केलेला केबल पूल काही दिवसांतच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबतदेखील अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. या पुलाच्या नूतनीकरणाच्या कामाची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे. या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले. 

१४० वर्षे जुना केबल पूलमोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते. 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरात