बायकोवर पाळत ठेवण्यासाठी घरभर लावले सीसीटीव्ही

By Admin | Updated: September 29, 2016 11:35 IST2016-09-29T11:35:32+5:302016-09-29T11:35:32+5:30

एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने बायकोवर वॉच ठेवण्यासाठी घरामध्ये चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. हैदराबादमधील ही घटना आहे.

CCTV brought to the house for surveillance of wife | बायकोवर पाळत ठेवण्यासाठी घरभर लावले सीसीटीव्ही

बायकोवर पाळत ठेवण्यासाठी घरभर लावले सीसीटीव्ही

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि.29 - एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने बायकोवर पाळत ठेवण्यासाठी घरामध्ये चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. हैदराबादमधील ही घटना आहे. शिव शंकर असे या व्यक्तीचे नाव आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये शिव शंकरचे पूर्णज्योतीसोबत लग्न झाले. लग्नानंतर शिवला पत्नीच्या आजारपणाबाबत माहिती समजली. त्यामुळे शिवनं पत्नीच्या पालकांसमोर त्यांच्याच दुस-या मुलीसोबत लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला.  मात्र हा प्रस्ताव पूर्णज्योती आणि तिच्या आई-वडिलांनी नाकारला.
 
प्रस्ताव नाकारल्यामुळे शिवकुमारने तिच्याकडे 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली, तिचा फोन काढून घेतला आणि तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी घरभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळलेल्या पूर्णज्योतीने अखेर
पोलिसात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत पोलिसांनीही शिव शंकरविरोधात गुन्हा दाखल केला. 
 

 

Web Title: CCTV brought to the house for surveillance of wife