सीबीएसईचे रॅगिंगवर सर्वेक्षण

By Admin | Updated: September 1, 2014 00:15 IST2014-09-01T00:15:57+5:302014-09-01T00:15:57+5:30

विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्य यांच्यासाठी काही प्रश्न तयार करण्यात आले होते. त्यांना ई-मेल द्वारे आपले मत व्यक्त करायचे होते.

CBSE Rugging Survey | सीबीएसईचे रॅगिंगवर सर्वेक्षण

सीबीएसईचे रॅगिंगवर सर्वेक्षण

नवी दिल्ली : ग्वाल्हेर येथील एक़ा स्कूलमधील रॅगिंग प्रकरणाची चर्चा सुरू असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डने (सीबीएसई) शाळेतील हाणामारी, रॅगिंंग, दुर्व्यवहार याची कारणे आणि त्याचे विविध पैलू समजण्यासाठी तसेच त्यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्य यांची मते जाणून घेण्यात आलीत.
विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्य यांच्यासाठी काही प्रश्न तयार करण्यात आले होते. त्यांना ई-मेल द्वारे आपले मत व्यक्त करायचे होते. हे काम काही दिवसांपासून सुरू होते, असे सीबीएसईचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
बोर्डाने या प्रश्नांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी, दुर्व्यवहार, शिवीगाळ या सारख्या घटनांची आकडेवारी गोळा केली आणि त्या रोखण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वर्गात, कॉरिडोर, बस स्टॉप, स्कूल बस, स्कूल भवन, कॅफेटेरिया इत्यादी पैकी कोणत्या ठिकाणी त्यांच्याशी किंवा अन्य विद्यार्थ्यांशी दुर्व्यवहार झाला, असा प्रश्न देखील होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: CBSE Rugging Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.