शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CBIvsCBI: वर्मा-अस्थाना वाद; ताब्यात घेतलेले ७ मोबाईल गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:44 IST

केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) विजनवासात पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयमधील दोन क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षाने आणखी वेगळे वळण घेतले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) विजनवासात पाठवण्यात आलेले संचालक आलोक वर्मा आणि सीबीआयमधील दोन क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यातील संघर्षाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. वर्मा व अस्थाना यांच्या होणाऱ्या चौकशीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असे सात मोबाईल फोन्स गूढरीत्या अदृश्य झाले आहेत. २२ आॅक्टोबर रोजी सीबीआयच्या विशेष तुकडीने सीबीआयचे उपअधीक्षक देवेंद्र कुमार यांचे कार्यालय आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यांत हे सात फोन्स ताब्यात घेण्यात आले होते.चौकशीत हे स्पष्ट झाले की, देवेंद्र कुमार हे अस्थाना यांचे अत्यंत विश्वासू चौकशी अधिकारी होते व ते सगळी संवेदनशील प्रकरणे हाताळत होते. त्यातील एक फोन हा अस्थाना यांच्याशी बोलण्यासाठी होता, तर दुसरा आंतरराष्ट्रीय कामांसाठी. सीबीआयनुसार देवेंद्र कुमार यांचे टेलिफोन्स हे सीबीआयच्या तांत्रिक शाखेच्या निगराणीखाली होते. १५ व १६ आॅक्टोबर रोजी देवेंद्र कुमार व इतरांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आलोक वर्मा यांच्या नियंत्रणाखाली ही तांत्रिक शाखा आली. फक्त एकच मोबाईल फोन जप्त केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. २२ आॅक्टोबर रोजी देवेंद्र कुमार यांना अटक केल्यावर सीबीआयने आठ मोबाईल जप्त केल्याचे म्हटले होते.दोन आठवडे ‘जैसे थे’चे न्यायालयाचे आदेशसक्तीच्या रजेवर पाठविलेले ‘सीबीआय’चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध तीन कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात आणखी दोन आठवडे ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी दिला. हा गुन्हा रद्द करावा यासाठी अस्थाना यांनी याचिका केली आहे. त्यावर प्रतिज्ञापत्र करून ‘सीबीआय’ने गुन्हा नोंदण्याचे समर्थन केले. न्या. नजमी वझिरी यांनी यास उत्तर देण्यासाठी अस्थाना यांना वेळ देत आधी दिलेला ‘जैसे थे’ आदेश १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविला.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागGovernmentसरकार