सीबीआय २८ सप्टेंबरला भूमिका मांडणार
By Admin | Updated: September 23, 2015 00:52 IST2015-09-23T00:52:17+5:302015-09-23T00:52:17+5:30
कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांना आरोपी म्हणून बोलावण्याची मागणी करणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा

सीबीआय २८ सप्टेंबरला भूमिका मांडणार
नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह अन्य दोघांना आरोपी म्हणून बोलावण्याची मागणी करणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या याचिकेवर सीबीआय येत्या २८ सप्टेंबर रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
युक्तिवादासाठी दुसरी एखादी तारीख देण्यात यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील आर. एस. चिमा यांनी विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांना केली. न्या. पाराशर यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी २८ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली. माजी कोळसा राज्यमंत्री दासरी नारायण राव यांनी मनमोहनसिंग यांना न्यायालयात बोलावण्याची मागणी केली आहे. मनमोहनसिंग यांनीच जिंदल समूहाच्या कंपनीला अमरकोंडा मुर्गादंगल कोळसा खाणपट्टा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा राव यांनी केला आहे.