व्यापमं तपासासाठी सीबीआयचे पथक
By Admin | Updated: July 12, 2015 23:18 IST2015-07-12T23:18:17+5:302015-07-12T23:18:17+5:30
मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि रहस्यमय व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने

व्यापमं तपासासाठी सीबीआयचे पथक
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि रहस्यमय व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याच्या तपासासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) संयुक्त संचालक स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ४० सदस्यांचे एक पथक नेमले आहे.
सीबीआयच्या विविध शाखांमधून निवडण्यात आलेले हे पथक सोमवारी भोपाळला पोहोचणार असून व्यापमं घोटाळ्याची पाळेमुळे खोदणार आहे. या पथकातील अधिकाऱ्यांबाबत सीबीआयने कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे. बिहार कॅडरचा एक अधिकारी व्यापमंच्या तपास पथकाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्तही सीबीआयने फेटाळून लावले आहे. ९ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने व्यापमं घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणे आणि कथित लोकांच्या मृत्यूचा तपास सीबीआयच्या सुपूर्द केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क