शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 13:31 IST

सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे.

नवी दिल्ली: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्याप्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सिसोदिया म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवालांनी सिसोदियांना शहीद भगत सिंग यांची उपमा दिली. याआधी, अंमलबजावणी संचालनालयाने उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीत 25 ठिकाणी छापे टा

मनीष सिसोदिया काय म्हणाले?सीबीआय कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिसोदियांनी ट्विट केले की, 'माझ्या घरावर 14 तास सीबीआयने छापे टाकले, काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या बँक लॉकरची झडती घेतली, त्यातही काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या गावात यांना काही सापडले नाही. आता यांनी उद्या सकाळी 11 वाजता मला मुख्यालयात बोलावले आहे. मी जाईन आणि तपासात पूर्ण सहकार्य करेन.'कले होते.

अरविंद केजरीवालांचे ट्विट यातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत मनीष सिसोदिया यांना भगत सिंग म्हटले. ते म्हणतात की, 'तुरुंग आणि फाशी भगतसिंग यांना रोखू शकली नाही. हा स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे. मनीष आणि सत्येंद्र आजचे भगतसिंग आहेत. 75 वर्षांनंतर गरीबांना चांगले शिक्षण देणारा आणि उज्ज्वल भविष्याची आशा देणारा शिक्षणमंत्री देशाला मिळाला. करोडो गरिबांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.'

काय आहे वाद?उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.

सिसोदियांच्या घरावर छापा 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेसाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणाची फाइल सीबीआयकडून घेतली. या प्रकरणी सीबीआयने 15 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाAAPआप