शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

उन्नाव पीडितेच्या अपघाताची चौकशी सीबीआयकडे द्यावी; यूपी सरकारची केंद्राला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 07:36 IST

भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर पीडित महिलेच्या गाडीला अपघात करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार पीडितेच्या कारला झालेल्या अपघाताची चौकशी सीबीआयने करावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. 

कार अपघातानंतर उन्नाव पीडितेची अवस्था सध्या गंभीर आहे. लखनऊच्या केजीएसी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे म्हणणं आहे की, अपघातामुळे महिलेच्या शरीराला जबरी दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला सध्या व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलंय. तसेच तिच्या शरीराच्या अनेक भागात फ्रॅक्चरदेखील करण्यात आलं आहे. 

भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर पीडित महिलेच्या गाडीला अपघात करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या अपघातात पीडित महिलेसोबतच तिची काकी, मावशी तसेच कोर्टात पीडितेची बाजू मांडणारे वकीलही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर क्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.  दरम्यान, आज या प्रकरणी बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर,  त्यांचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि अन्य आठ जणांविरोधात, हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कृत्य आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात  सीबीआयनं भाजपाचे आमदार कुलदीप सिंह  सेंगरला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्याविरोधात तीन गुन्हे दाखल देखील करण्यात आले होते. भारतीय दंडसंहितेच्या कलम 363 (अपहरण), 366 (महिलेचे अपहरण), 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

नेमके काय आहे प्रकरण?  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेंगर  व त्यांच्या साथीदारांनी जून 2017 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीनं केला आहे. याप्रकरणी न्याय मिळावा यासाठी युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल 2018) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु, उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान ते मरण पावले होते.    

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणCBIगुन्हा अन्वेषण विभागUttar Pradeshउत्तर प्रदेश