रवी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशी केंद्राची मंजुरी

By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30

नवी दिल्ली : आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस केंद्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली.

CBI seeks CBI inquiry into Ravi's death | रवी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशी केंद्राची मंजुरी

रवी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशी केंद्राची मंजुरी

ी दिल्ली : आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस केंद्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली.
कर्नाटक सरकारने यासंदर्भात निश्चित कालमर्यादा नसलेली एक नवी अधिसूचना जारी केल्यानंतर केंद्राने हा निर्णय घेतला. कार्मिक व प्रशिक्षण विभागाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीर्चा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अधिसूचना जारी केली. कर्नाटक सरकारने याआधी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची विनंती केली होती. मात्र तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण व्हावी, असे राज्य सरकारने यात म्हटले होते. तथापि, सीबीआयने ही विनंती अमान्य केली होती. चौकशीसाठी कुठलीही निश्चित कालमर्यादा असू शकत नाही, असे सीबीआयने म्हटले होते. यानंतर राज्य सरकारने रवी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी गत ६ एप्रिलला नव्याने अधिसूचना जारी केली होती. २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी रवी गत १६ मार्चला बेंगळुरातील आपल्या निवासस्थानी रहस्यमयस्थितीत मृतावस्थेत आढळले होते.

Web Title: CBI seeks CBI inquiry into Ravi's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.