केजरीवालांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

By Admin | Updated: December 15, 2015 11:46 IST2015-12-15T10:38:35+5:302015-12-15T11:46:46+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने छापा मारला.

CBI raids on Kejriwal's office | केजरीवालांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

केजरीवालांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने छापा मारला. सीबीआयने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. सीबीआयने मारलेल्या छाप्यांमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्वत: केजरीवालांनी टि्वटरवरुन या छाप्यांची माहिती दिली.

केजरीवालांनी या कारवाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं आहे. पंतप्रधान मोदी मला राजकीयदृष्टया हाताळू शकत नाहीत त्यामुळे ते असे भ्याड मार्ग अवलंबत असल्याची टीका त्यांनी टि्वटरवरुन केली. 
आधी कोणाला कुठले अधिकार यावरुन दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष सुरु होता. आता शकुरबस्तीमध्ये एकारात्रीत पाडण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांवरुन केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये संघर्ष सुरु आहे. 

Web Title: CBI raids on Kejriwal's office